महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून ऑनलाइन प्रशिक्षण Agrowon
ताज्या बातम्या

Mpkv clymex : महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘एमपीकेव्ही क्लायमेक्स’चे आयोजन

कृषी विद्यापीठात २० ते २२ डिसेंबर या कालावधीत एमपीकेव्ही क्लायमेक्स-२०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

कृषी विद्यापीठात २० ते २२ डिसेंबर या कालावधीत एमपीकेव्ही क्लायमेक्स-२०२२ (MPKV Clymex 2022) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कृषी उद्योजकांचे व इतर उद्योजकांचे प्रदर्शन, कृषी पदवीधरांचा मेळावा, कृषी पदवीधरांसाठी रोजगार मेळावा, यशस्वी कृषी उद्योजकांची व्याख्याने, शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात यंदा कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जात आहे. यंदा डॉ. पाटील यांच्या पुढाकाराने नाहेप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स-२०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २२ डिसेंबर या कालावधीत तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात यशस्वी कृषी पदवीधर उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे.

आतापर्यंत रोजगार मेळाव्यासाठी १००० कृषी पदवीधरांनी व ३० कंपन्यांनी नाव नोंदणी केल्यामुळे बऱ्याच तरुण कृषी पदवीधरांना या एमपीकेव्ही क्लायमेक्समध्ये कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी येथेच निश्‍चित करता येणार आहे. अधिक माहितीसाठी एमपीकेव्ही क्लायमेक्सच्या https://mpkv-climex२०२२.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे व प्रदर्शन, कृषी पदवीधर मेळावा, शेतकरी, विद्यार्थी व इतर घटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT