Monsoon Update agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : राज्यात पूढचे २४ तास अतिमहत्वाचे, अनेक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी

Konkan Rain Alert : उत्तर कोकण आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Team Agrowon

Monsoon Update 2023 : राज्यात मागच्या २४ तासांपासून पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. दरम्यान पुढच्या २४ तासांत उत्तर कोकण आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागप्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे दिली.

पुढील २४ तासात उत्तर कोकण आणि उत्तरेकडील भागात अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रायगड, पालघर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग याभागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

घाटमाथ्यावर देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील अनेक भागात अतिवृष्टी सदृष पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान पुढच्या ४८ तासांत ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती देण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

दरम्यान, रत्नागिरीमध्ये सध्या वशिष्ठी नदी धोका पातळीवर वाहत आहे. तर झालेल्या पावसाने चिपळूण कराड रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झालेली आहे. दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून थोड्या वेळात वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

मागच्या दोन दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस होत आहे दरम्यान पुढच्या दोन दिवसांत हा जोर तसाच राहण्याची शक्यता आहे. कोकणासह विदर्भात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या अजूनही १७ टक्के पाऊस कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT