Lumpy Vaccination Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Vaccination : खालापुरात ७२६३ पशूंचे लसीकरण

तालुक्यातून लम्पी आजार हद्दपार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कंबर कसली असून शंभर टक्के गुरांचे लसीकरण झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी यांनी दिली आहे.

टीम ॲग्रोवन

खालापूर, जि. रायगड ः तालुक्यातून लम्पी आजार (Lumpy Skin Disease) हद्दपार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कंबर कसली असून शंभर टक्के गुरांचे लसीकरण झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी यांनी दिली आहे. तालुक्यात लम्पीचा शिरकाव झाल्यानंतर पशुसंवर्धन (Department Of Animal Husbandry) विभाग सतर्क झाला होता.

गुरांची गावोगावी जाऊन तपासणी आणि गोठा निर्जंतुकीकरण काम सुरू होते. परंतु रसायनीतील वडगाव येथील शेतकरी संतोष ठोंबरे यांच्या खिल्लार बैलाचा लम्‍पी आजाराने मृत्यू झाला आणि शेतकरी गर्भगळीत झाला होता.

दुभत्या जनावरास लम्‍पी रोगाची लागण झाल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बळीराजाला जाणवत होता. त्यानंतर तालुक्यात लसीकरण मोहिमेला वेग आला होता. खालापूर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या पशुगणनेनुसार गोवंश वर्गातील ७,२६३ गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. खालापूर पशुवैद्यकीय अधिकारी पी. एन. गायकवाड यांनी पंचवीस गावात जवळपास १,१०० गुरांचे लसीकरण पूर्ण केल्याचे सांगितले.

२० व्या पशुगणनेनुसार खालापूर तालुक्यात ७२६३ गायवर्गीय जनावरे असून, सर्व गावांतील गायवर्गीय जनावरांचे लसीकरण हे जवळपास १००% पूर्ण झाले आहे. तरी लसीकरणाच्या दिवशी काही कारणामुळे अजूनही आपली गायवर्गीय जनावरे लम्पी चर्म रोग प्रतिबंध लसीकरणापासून वंचित राहिली असल्यास पशुपालकांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.

- डॉ. एम. एम. मर्चंडे, पशुधन विकास अधिकारी गट अ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT