Bail Pola Agrowon
ताज्या बातम्या

बैल सजावटीचे साहित्य खरेदीला प्रतिसाद कमी

नाशिक शहरात पंचवटी परिसरात निमानी, पेठ नाका, बाजार समिती व्यापारी संकुल, सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटलेली असतात. शेतकऱ्यांची गर्दी काहीशी कमीच आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : बैल (Bull) हा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक जोडलेला घटक आहे. बैलां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी तयारी करत असतो. त्यामुळे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ फुलते; मात्र चालूवर्षी कोरोनाचे (Corona) कुठलेही निर्बंध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे; मात्र सजावटीच्या साहित्याच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाल्याने खरेदीला प्रतिसाद कमी असल्याने विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक कोंडी कायम असल्याने यावर्षीही बाजार अपेक्षित फुललेला नाही.

दरवर्षी पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी घुंगरमाळ, बाशिंग, बेगडं, शिंगाचे गोंडे, बैलांना रंग, रंगीत पट्ट्या, नवीन कासरे अशा साहित्याने बाजारपेठ भरलेली असते. गतवर्षीच्या तुलनेत चालूवर्षी बाजारपेठेत दुकाने थाटून ती फुलली आहेत; मात्र साहित्याच्या वाढलेल्या दरामुळे बैलांना सजविण्याची शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग कमी दिसून आली.

नाशिक शहरात पंचवटी परिसरात निमानी, पेठ नाका, बाजार समिती व्यापारी संकुल, सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटलेली असतात. शेतकऱ्यांची गर्दी काहीशी कमीच आहे. एकीकडे यांत्रिकीकरण वाढल्याने बैलांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. काहींनी हौसेपोटी बैलजोड्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे बाजारात विक्रेत्यांनी साहित्य भरले; मात्र दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा प्रतिसाद काहीसा कमीच आहे. त्यामुळे हिरमोड झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

चालूवर्षी शेतकरी खरेदीसाठी येतील अशी अपेक्षा होती; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याला कारण यावर्षी प्रत्येक वस्तू मागे जवळपास २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी थोडीफार खरेदी करत आहे.
जयवंताबाई अल्हाट, साहित्य विक्रेत्या, पंचवटी-नाशिक.
शिवारात मोठे नुकसान आहे. थोडाफार शेतीमाल विकायला आणतो; मात्र त्याचे पैसे होत नाहीत. त्यामुळे पैसे नसल्याने थोडीफार खरेदी केलेली आहे. त्यातच चालू वर्षी सर्वच साहित्याच्या दरात वाढ झाल्याने अडचण आहे.
बाजीराव जाधव, उमराळे, ता. दिंडोरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT