Dada Bhuse Agrowon
ताज्या बातम्या

‘५० खोके, मंत्री ओके’

कांद्याचा भाव, सरकारने जाहीर न केलेला ओला दुष्काळ यामुळे शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या याच रोषाचा सामना एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांना करावा लागला आहे.

टीम ॲग्रोवन

धुळे : कांद्याचा भाव (Onion Rate), सरकारने जाहीर न केलेला ओला दुष्काळ (Wet Drought) यामुळे शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या याच रोषाचा सामना एकनाथ शिंदे सरकारमधील (Eknath Shinde Government) मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना करावा लागला आहे. भुसे यांना काळे झेंडे दाखवत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच भुसे यांच्या विरोधात '५० खोके मंत्री ओके'च्या जोरदार घोषणा दिल्या.

बंदरे व खनिकर्ममंत्री भुसे शनिवारी (ता.३) धुळे दौऱ्यावर होते. या वेळी साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना शेतकऱ्यांनी भुसे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. विशेष म्हणजे भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी भुसे यांना डावलत कांदा प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची सूचना केली.

कांद्याला भाव मिळत नाही. साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. या वेळी आंदोलकांनी ‘५० खोके, मंत्री ओके' अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.

दरम्यान, दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक आंदोलक काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. मात्र, त्यांना मदत होताना दिसत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. शिवाय, भुसे यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ‘५० खोके, मंत्री ओके,’ अशा घोषणा देत त्यांचा निषेध केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT