Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस

Maharashtra Rain Update : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर पावसाची चांगलीच संततधार सुरू होती.

Team Agrowon

Pune Rain News : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर पावसाची चांगलीच संततधार सुरू होती. तर लोणावळा, शिरगाव, ठाकूरवाडी, अंबोणे, ताम्हिणी या घाटमाथ्यांवरही जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे ओढे-नाले खळाळून वाहू लागले असून, भात खाचरे भरू लागली आहेत.

पाऊस सुरू होऊन जवळपास आठ दिवस झाले आहे. या काळात कमीअधिक पाऊस पडला आहे. पूर्व भागात पावसाचा जोर कमी असला, तरी अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. मात्र पश्‍चिम पट्ट्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या भागांतील घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला, तरी अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे धरणांत पाण्याची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे हळूहळू पाण्याची वाढ होऊ लागली आहे.

नीरा खोऱ्यातील वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ६१ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, पवना ३८, भामा आसखेड २२, आंध्रा २०, गुंजवणी २४, भाटघर १५, चासकमान १५, कासारसाई १४ मिलिमीटर पाऊस पडला. तर शेटफळ, नाझरे, वीर या धरण क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

मुठा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामध्ये टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५२ मिलिमीटर पाऊस पडला असून, वरसगाव २२ मिलिमीटर, पानशेत २१ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणक्षेत्रात अवघा पाच मिलिमीटर पाऊस पडला.

कुकडी खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक आहे. पिंपळगाव जोगे धरणक्षेत्रात २४ मिलिमीटर, तर वडज २० मिलिमीटर, चिल्हेवाडी १६ मिलिमीटर, माणिकडोह १४, डिंभे १२ मिलिमीटर पाऊस पडला असून, येडगाव आणि घोड धरण क्षेत्रात तुरळक पाऊस बरसला. विसापूर, उजनी धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याची नोंद झाली आहे.

तसेच मुळशी धरण क्षेत्रात ४२ मिलिमीटर पाऊस पडला असून, ठोकरवाडी २५, शिराटा ६१, वळवण ६४, लोणावळा ७९, कुंडली या घाट माथ्यावर ५६ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अवघा १.०१ मिलिमीटर पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT