Rain  Agrown
ताज्या बातम्या

Pune Rain : पुणे जिल्ह्यात हलक्या सरी

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात अधूनमधून ऊन पडत असले तरी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडल्यानंतर आता जोर कमी झाला आहे. मात्र मंगळवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मावळ, मुळशी, वेल्हा, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस (Rain) पडला. तर लोणावळा येथे ७७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे भात पट्ट्यात लागवडींना (Paddy Cultivation) सुरुवात झाली आहे.

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात अधूनमधून ऊन पडत असले तरी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. पूर्व भागात पाऊस नसला तरी अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे तणांचे प्रमाण वाढीस लागले आहे. सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची स्थिती आहे.

हवेली तालुक्यात भोसरी येथे १९ मिलिमीटर तर चिंचवड येथे १४ मिलिमीटर पाऊस पडला. तर पुणे शहर, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, कळस, हडपसर, वाघोली येथेही तुरळक सरी बरसल्या. मुळशी तालुक्यात पावसाचा जोर बऱ्यापैकी असून पौड २७, घोटावडे ३५, थेरगाव, माले ४५, मुठे २०, पिरंगुट १३ मिलिमीटर पाऊस पडला. भोरमधील भोलावडे येथे १४ मिलिमीटर, संगमनेर ११, निगुडघर १२ मिलिमीटर पाऊस पडला असून नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे भागांत हलक्या सरी बरसल्या. मावळमधील खडकाळा येथे ५५, वडगाव मावळ ३१, तळेगाव २५, कार्ला ३४, कार्ला ५१, शिवणे ३९, वेल्ह्यातील पानशेत ३२, वेल्हा १५, विंझर १०, जुन्नरमधील नारायणगाव ४६, जुन्नर १५, वडगाव आनंद १०, निमगाव सावा १८, बेल्हा १६, राजूर ३५, डिंगोरे २०, आपटाळे १६, ओतूर १२ खेडमधील वाडा १७, कुडे २७, पाईट २२, कन्हेरसर २२, कडुस ११ मिलिमीटर पाऊस पडला. तर चाकण, राजगुरुनगर,

पिंपळगाव भागात अंशतः ढगाळ हवामान होते. आंबेगावमधील आंबेगाव ६२ मिलिमीटर पाऊस पडला असून, घोडेगाव येथे ४५, कळंब २५, मंचर २२ मिलिमीटर पाऊस पडला. शिरूरमधील पाबळ वगळता उर्वरित टाकळी, वडगाव, न्हावरा, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, शिरूर तुरळक सरी पडल्या. बारामतीतील माळेगाव, वडगाव, लोणी, सुपा, उंडवडी इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, अंथुर्णे, सणसर.दौंडमधील, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड. पुरंदरमधील भिवंडी, जेजुरी, राजेवाडी, वाल्हा भागातही पावसाचा शिडकावा झाला.

मंगळवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

तालुका --- पडलेला पाऊस

पुणे शहर --- २.४०

हवेली --- ५.९०

भोर --- ८.२५

मावळ --- ४४.५७

वेल्हा --- १६.२५

जुन्नर --- २२.००

खेड --- १३.३३

आंबेगाव -- ३२.००

शिरूर -- ५.२२

बारामती -- १.७५

इंदापूर -- २.९५

दौंड -- ३.३८

पुरंदर -- ०.५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT