Pesticide Licence Agrowon
ताज्या बातम्या

Pesticide Licence : तीन विक्रेत्यांचे परवाने निलंबित

कीटकनाशकांच्या विक्रीत त्रुटी आढळल्यामुळे जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते आणि आष्टी येथील तीन कृषी विक्रेत्यांचा कीटकनाशक विक्रीचा परवाना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे.

Team Agrowon



सोलापूर ः कीटकनाशकांच्या विक्रीत त्रुटी आढळल्यामुळे जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते आणि आष्टी येथील तीन कृषी विक्रेत्यांचा कीटकनाशक विक्रीचा परवाना (Pesticide Licence) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे.

विठ्ठल कृषी केंद्र (आष्टी, ता. मोहोळ), महावीर ट्रेडिंग कंपनी (माळशिरस, ता. माळशिरस) आणि कलाशंकर कृषी केंद्र, (नातेपुते, ता. माळशिरस) या तीन विक्रेत्यांचा त्यात समावेश आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वीच या विक्रेत्यांच्या दुकानांची तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली. त्या वेळी या विक्रेत्यांकडे काही त्रुटी आढळल्या. त्यात प्रामुख्याने कीटकनाशकाचा साठा व भावफलक ग्राहकास सहज दिसेल, असा लावला नाही.

मॅाडर्न अॅग्रोजेनेटिक्स लिमिटेड या कीटकनाशके पुरवठा धारकाचे प्रमाणपत्र मंजूर नसतानाही त्यांच्या उत्पादनांची विक्री केली. शेतकऱ्यांना कीटकनाशक विक्री करताना आणि त्याची बिले देताना त्यावर खरेदीदाराचे नाव, औषधाचे नाव, कंपनीचे नाव, पॅकिंगप्रकार, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, मुदत संपण्याची तारीख, किंमत वा सही आदी माहिती नसल्याचे आढळले. या त्रुटींवर संबंधित दुकानदारांकडून खुलासाही मागवण्यात आला. पण तो समाधानकारक नसल्याने अखेरीस शिंदे यांनी या विक्रेत्यांचा कीटकनाशक विक्रीचा परवाना अनिश्चित काळासाठी निलंबित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT