Leopard Cub Death Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Cub : पाटणा शिवारात आढळले बिबट्याचे बछडे

पाटणा (ता.चाळीसगाव) शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. या शेतातील उसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

टीम ॲग्रोवन

चाळीसगाव, जि.जळगाव : पाटणा (ता.चाळीसगाव) शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड (Sugarcane Harvest) सुरू आहे. या शेतातील उसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे (Leopard Cub) आढळून आले. हा प्रकार नुकताच उघडकीला आला. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल होण्याअगोदर मादीने दोन्ही बछडे उचलून नेले.

तालुक्यातील वलठाण येथील शेतकरी कल्पेश गोरखनाथ राठोड यांची पाटणा शिवारात गट क्रमांक १७२ शेतजमीन आहे. यात त्यांनी उसाची लागवड केली होती. त्यामुळे त्यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. मात्र ऊसतोडणी सुरू असताना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला कळविले. त्यानंतर चाळीसगाव वन परीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी शेतकऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क केला आणि परिसर निर्मनुष्य करण्याच्या सूचना केल्या. लागलीच त्या आपल्या शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचल्या. मात्र तोपर्यंत बिबट्याचे दोन्ही बछडे मादीने उचलून नेले असल्याचे कळाले.

या घटनेची माहिती मिळताच परिसर निर्मनुष्य करण्याबाबत सूचना केल्या. मात्र शेतात पोहोचण्याअगोदर मादीने दोन्ही बछडे नेले. त्यामुळे परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून, कोणालाही बछडे आढळून आल्यास त्यांनी ते हाताळू नये, सेल्फी काढू नये, असे चाळीसगावच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT