Leopard Terror  Agrowon
ताज्या बातम्या

Leopard in Chandrapur: राजुरा वनपरीक्षेत्रात बिबट्या जेरबंद

राजुरा वन परीक्षेत्रातील विहीरगाव उपक्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले.

Team Agrowon

राजुरा, जि. चंद्रपूर ः राजुरा वन परीक्षेत्रातील विहीरगाव उपक्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास (Leopard) वनविभागाने (Forest Department) पिंजऱ्यात जेरबंद केले.

यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या बिबट्याने (Leopard Terror) गावातील दोन बकऱ्या आणि कुत्र्यास ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने या भागात पिंजरे लावले होते.

राजुरा वन परीक्षेत्रातील विहीरगाव उपक्षेत्रातील मडगाव कोहपरा शेतशिवारातील इंदिरा मारुती चांदेकर यांच्या शेतात बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.

या पिंजऱ्यात बिबट अलगद अडकला. अंदाजे दोन ते अडीच वर्षे वयाचा हा बिबट आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे निवेदन देऊन केली होती. त्यानंतर या भागात पिंजरा लावण्यात आला.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात राजुरा वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, विहीरगावचे वन क्षेत्र सहाय्यक नरेंद्र देशकर, वनरक्षक संजय सूर्यवंसे, सयस हाके, दिलीप जाधव, वनमजूर हरिभाऊ बेसूरवार, प्रभाकर टेकाम, शेतकरी मंगेश मोरे यांनी प्रयत्न केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT