Rain Agrowon
ताज्या बातम्या

Latur Rain Update : लातूर जिल्ह्यात दोन नक्षत्रात १३६ मिलिमीटर पाऊस

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेले. पण आर्द्रा नक्षत्र संपता संपता पाऊस झाला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्याला सुरवात होऊ शकली आहे. आता गुरुवारपासून सुरु झालेल्या पुनर्वसू नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. दोन नक्षत्रात जिल्ह्यात सरासरी १३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्याला मोठ्या पावसाची गरज आहे.

जिल्ह्यात या वर्षी खरीप पेरण्या वेळेवर होवू शकलेल्या नाहीत. मृग नक्षत्र कोरडे गेले, आर्द्रा नक्षत्रात सुरवातीला पाऊस झाला. पण नंतर मात्र उघडीप दिली. मात्र शेवटच्या एक दोन दिवस मात्र जिल्ह्यात सर्वच साठही महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली. अनेक मंडळात तर पावसाने दमदार हजेरी लावली.

या पावसामुळे शेतकरी थोडा सुखावला गेला. खरीप पेरण्याची आता लगबग सुरु झाली आहे. जिल्हयात अनेक ठिकाणी शेतकरी आता पेरण्या करीत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ता. सात जून ते सात जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७७.६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात मात्र १३६.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

याची टक्केवारी ७६.६ इतकी आहे. जिल्ह्यात औसा तालुका वगळता इतर नऊ तालुक्यात शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यात सर्वाधिक २७४.५ मिलिमीटर पाऊस देवणी तालुक्यात झाला आहे. त्या पाठोपाठ उदगीर तालुक्यात २१६.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वात कमी ८७.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

लातूर जिल्ह्यात मृग व आर्द्रा नक्षत्रात तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

तालुका जूनपासूनचा

पाऊस पावसाची

टक्केवारी

लातूर १४०.० ७७.३

औसा ८७.५ ५१.६

अहमदपूर १०२.५ ५३.६

निलंगा १०८.० ६१.८

उदगीर २१६.३ १२९.७

चाकूर ११६.७ ६३.५

रेणापूर १०१.४ ६६.१

देवणी २७४.५ १८७.८

शिरुर अनंतपाळ १७५.६ १२९.१

जळकोट १२०.६ ८०.६

एकूण १३६.१ ७६.६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT