Dr. M. S. Swaminathan Agrowon
ताज्या बातम्या

Dr. M. S. Swaminathan : कृषक समाज पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ. स्वामिनाथन यांची भेट

कृषक समाजातर्फे स्वामीनाथन यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्वामीनाथन यांनी डॉ. पंजाबरावांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

Team Agrowon

अकोला ः कृषी हरित क्रांतीचे जनक, जागतिक दर्जाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा राष्ट्रीय कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. एस. स्वामीनाथन (Dr. M. S. Swaminathan) यांची भारत कृषक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चेन्नई येथे भेट घेतली.

कृषक समाजाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर (Dr. Prakash Mankar), उपाध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांनी भेट घेत चर्चा केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालिका तथा स्वामीनाथन यांची मुलगी डॉ. सोमय्या स्वामीनाथन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कृषक समाजातर्फे स्वामीनाथन यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्वामीनाथन यांनी डॉ. पंजाबरावांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

ग्रामीण भागाच्या व गरीब शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिने भरीव ठोस उपाययोजना करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. स्वामीनाथन ९७ वर्षांचे आहेl. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT