Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : कोकणात देशातील सर्वाधिक तापमान

राज्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर सध्या निरभ्र आकाश होत आहे. राज्याच्या किमान तापमानात काहिशी घट झाली आहे. तर निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यातील ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निवळल्यानंतर सध्या निरभ्र आकाश होत आहे. राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) काहिशी घट झाली आहे. तर निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्याने राज्यात उन्हाचा चटका (Heat) वाढला आहे. उन्हाची ताप अधिक असल्याने कोकणात गेले काही दिवस सातत्याने देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची (Maximum Temperature) नोंद होत आहे.

कोकणात कमाल तापमान पस्तिशी पार पोचले आहे. रत्नागिरी येथे देशातील सर्वाधिक रत्नागिरी देशातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यातही कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पार आहे.

राज्याच्या किमान तापमानातही घट झाली असून, अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरले आहे. विदर्भातील यवतमाळ येथे राज्यातील निचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २०) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

हरियाणातील हिस्सार येथे सोमवारी (ता. १९) देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंकेकडे सरकतेय

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली ओसरत आहे. तर आग्नेय बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. उद्यापर्यंत ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.२ (१४.२), जळगाव - (१३.०), धुळे ३१.० (१२.४), कोल्हापूर ३१.५ (१८.८), महाबळेश्वर २६.४(१४.४), नाशिक ३०.३ (१४.९), निफाड ३१.४ (१३.०), सांगली ३२.२ (१७.०), सातारा ३१.०(१७.१), सोलापूर ३३.७ (१६.३), सांताक्रूझ ३५.२(२२.०), डहाणू ३१.१ (२१.५), रत्नागिरी ३५.६ (२३.९), औरंगाबाद ३१.० (१२.६), नांदेड ३०.८ (१४.०), परभणी ३०.८ (१३.५), अकोला ३२.८ (१५.९), अमरावती ३१.४ (१३.७), बुलढाणा २९.८ (१४.०), ब्रह्मपूरी ३१.६ (१३.४), चंद्रपूर २८.८ (१४.२), गडचिरोली २९.६(१२.६), गोंदिया ३०.५(१०.६), नागपूर २९.२ (११.४), वर्धा २९.२(१२.८), यवतमाळ २८.० (१०.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rural Water Scarcity: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपाययोजना

Sugarcane Crushing Season: ऊस हंगामास आजपासून प्रारंभ; शेतकरी संघटनांची हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी

October Heat Stress: ऑक्टोबर हीटमध्ये पालेभाज्यांवर ताणाची शक्यता, वेळीच घ्या काळजी

Cooperation Minister's Assurance: सहकारमंत्र्यांच्या आश्वासनाकडे सर्वांचे लक्ष; साखर उद्योग संघटनांनी दिली आठ दिवसांची मुदत

Mahavitaran Employees Protest: ‘महावितरण’विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश; द्वारसभेतून मागण्यांना आवाज

SCROLL FOR NEXT