Kolhapur Jilha Parishad Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Jilha Parishad : झेडपी सीईओंच्या अचानक भेटीने पशुसंवर्धन विभागाची धावपळ, लम्पीबाबत घेतला आढावा

Kolhapur ZP CEO : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी अचानक गावांना भेटी दिल्या.

Team Agrowon

Kolhapur News : मागच्या दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी संसर्गजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात याचा संसर्ग वाढल्याने जनावरांना वेळेत उपचार होत नसल्याने गायी आणि बैलांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान यावर आरोग्य प्रशासनाकडून काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे आरोप करण्यात आले होते. यावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी अचानक गावांना भेटी दिल्या. यावेळी आरोग्य कर्मचारी करत असलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी अचानक हातकणंगले तसेच शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीसह अन्य गावांना भेटी दिल्या. या भेटीवेळी त्यांनी गावागावांत पसरत असलेल्या लम्पी आजाराची व सुरू असणाऱ्या लसीकरणाची माहिती घेतली. पाटील यांच्या अचानक झालेल्या गाव भेटीने पशुसंवर्धन विभाग व गट विकास अधिकारी कार्यालयाची चांगलीच धावपळ उडाली.

जिल्ह्यात सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जवळपास ९५ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी पाटील यांनी रविवारी अचानक शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या.

७ हजार जनावरांना लम्पी आजार झाला होता, तो पूर्ण बरा झाला आहे. तर २२६३ जनावरांना सध्या या आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लम्पी आजाराने ५८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT