Earthquake kolhapur agrowon
ताज्या बातम्या

Earthquake kolhapur : कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, चांदोली अभयारण्य केंद्रबिंदू

Chandoli Dam Earthquake : कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी भूकंपाचे धक्के बसले.

Team Agrowon

Kolhapur, Sangli, Satara Earthquake : कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान या भूकंपाची तीव्रत कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यात जाणवली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप असून त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान सर्वात पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील कोयना धरण असलेल्या पाटण तालुक्याला ६ वाजून ४० मिनिटांनी धक्का भूकंपाचा धक्का बसला.

हे धक्के कोयना धरणापासून २० किमी अंतरावर जाणवले असल्याने धरण क्षेत्राला कोणतीही बाधा न झाल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. २९ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले आणि जमीनही हादरली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT