SIILC Agrowon
ताज्या बातम्या

SIILC : जाणून घ्या निर्यातक्षम शेवगा लागवडीतील संधी

शेवग्यासाठी परदेशी बाजारपेठेतील निर्यातीच्या संधी इ.बाबत मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा शनिवार, ता. ७ जानेवारीला सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे पुण्यात आयोजिली आहे.

Team Agrowon

पुणे : स्थानिक तसेच परकीय बाजारपेठेत (Exotic Market), आयुर्वेद औषधींमध्ये तसेच आहारात शेवग्याचा वापर वाढल्याने शेवगा शेंगांना वर्षभर मागणी तसेच दरही चांगला मिळू लागला आहे. या पिकाची व्यावसायिक दृष्टीने शेती करण्यासाठी निर्यातक्षम शेवगा लागवड (Moringa Cultivation) कशी करावी, स्थानिक व

परदेशी बाजारपेठेतील निर्यातीच्या संधी इ.बाबत मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा शनिवार, ता. ७ जानेवारीला सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे पुण्यात आयोजिली आहे.

कार्यशाळेत शेवग्याच्या आधुनिक जातींची ओळख, खत व पाणी, छाटणीचे व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ.विषयी मार्गदर्शन होईल.

प्रतिव्यक्ती पंधराशे रुपये शुल्क आहे. यात जेवण, चहा, प्रमाणपत्र देण्यात येईल. आगाऊ नावनोंदणी आवश्यक. नाव नोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१. कार्यशाळेचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT