MSP Agrowon
ताज्या बातम्या

MSP : हमीदरासाठी किसान सभा देशव्यापी लढा उभारणार

अखिल भारतीय किसान सभेचे ३५ वे राष्ट्रीय अधिवेशन केरळमधील त्रिचूर येथे झाले. चार दिवस चाललेल्या या अधिवेशनास देशातील २६ राज्यांतील १ कोटी ३७ लाख शेतकरी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे ७५६ प्रतिनिधी उपस्थित होते.

टीम ॲग्रोवन

नगर ः अखिल भारतीय किसान सभेचे (Kisan Sabha) ३५ वे राष्ट्रीय अधिवेशन केरळमधील त्रिचूर येथे झाले. चार दिवस चाललेल्या या अधिवेशनास देशातील २६ राज्यांतील १ कोटी ३७ लाख शेतकरी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे ७५६ प्रतिनिधी उपस्थित होते.

या अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक ढवळे यांची, तर शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली. शेतीमालाला दीडपट हमी दर मिळावा, या साठी देशव्यापी लढा उभारण्याचा किसान सभेने या अधिवेशनात निर्णय घेतला.

किसान सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाने आगामी तीन वर्षांसाठी १४९ जणांची अखिल भारतीय किसान कौन्सिल, ७७ जणांची केंद्रीय किसान कमिटी व २१ जणांच्या पदाधिकारी मंडळाची निवड केली. सरचिटणीसपदी विजू कृष्णन, कोषाध्यक्षपदी पी. कृष्णप्रसाद, ज्येष्ठ उपाध्यक्षपदी हन्नन मोल्ला यांची निवड करण्यात आली. केंद्रीय किसान समितीवर महाराष्ट्रातून उमेश देशमुख व किसन गुजर यांची, तर सुभाष चौधरी, रडका कलांगडा, अर्जुन आडे यांची अखिल भारतीय किसान कौन्सिलवर निवड करण्यात आली.

सरकारच्या नवउदारवादी आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून सुरू झालेल्या कृषी संकटाने भारतीय शेतकरी वेढला गेला आहे. शेतीमालाची भरमसाट आयात करून येथील शेतीमालाचे भाव पाडले जात आहेत. शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे. खर्च अधिक व मिळकत कमी अशा परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभा देशव्यापी आंदोलन करेल, असे डॉ. नवले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT