Farmer March Agrowon
ताज्या बातम्या

Farmer March : अखेर अकोले ते लोणी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा स्थगित ; किसान सभेची घोषणा

Farmer Protest : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून लोणीच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा पायी मोर्चा अखेर स्थगित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Kisan Sabha अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून लोणीच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा पायी मोर्चा Farmer March) अखेर स्थगित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती किसान सभेचे नेते कॉ. अशोक ढवळे (Ashok Dhavle) यांनी दिली.

शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसदर्भात किसान सभेच्या नेतृत्त्वात आंदोलन पुकारण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेच्या शिष्टमंडाळाची बैठक झाली होती.

मात्र, इतर संबंधित खात्याचे मंत्री बैठकीसाठी उपस्थित नव्हते. परिणामी आंदोलनाबाबात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे किसान सभेने मोर्चा काढण्याची भूमिका कायम ठेवत नियोजित आंदोलनाला सुरूवात केली.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेतली. किसान सभेच्या नेत्यांसोबत पुन्हा एकदा गुरूवारी (ता.२७) राज्य सरकारने चर्चा केली. या बैठकीसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह कामगार मंत्री अशोक खाडे हेदेखील उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन स्थतिग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. अजित नवले म्हणाले की, वन जमिनीचे सगळे दावे निकाली निघेपर्यंत आणि प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत जमिनीवरून कुणालाही विस्थापित केले जाणार नाही, कुणालाही हाकलून लावले जाणार नाही. हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.

शेतकऱ्यांना तातडीने १५ कोटी नुकसान भरपाई दिली जाईल. हिरड्याची खरेदी करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात ९ मे रोजी बैठक होणार, असल्याचे नवले यांनी सांगितले.

'वन्य प्राण्यांमुळे शेतीच होणार नुकसान टाळण्यासाठी सरकार लवकरच उपाययोजना करणार आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी वरकस जमिनी कसतात, त्या शेतकऱ्यांचाच त्याववर हक्क असेल, असा निर्णय झाला आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही होणार आहे.

याशिवाय वरकस जमिनीबाबत पीक पेरा नोंद होण्याचा प्रश्नही निकाली काढण्यात आला आहे. तसेच देवस्थान जमिनीबाबत कायदा करणार येईल, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT