Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing: राज्यातील खरिपाचा पेरा ५३ टक्क्यांनी पिछाडीवर

Kharif Season : ज्यात यंदा सर्वदूर जोरदार पाऊस झाला नाही. अनेक भागात आतापर्यंत शेतातून पाणी वाहले नाही. त्यामुळे राज्यातील पेरणी यंदा पिछाडीवर आहे.

Team Agrowon

Kharif Crop: पुणेः राज्यात यंदा सर्वदूर जोरदार पाऊस झाला नाही. अनेक भागात आतापर्यंत शेतातून पाणी वाहले नाही. त्यामुळे राज्यातील पेरणी यंदा पिछाडीवर आहे. राज्यात खरिपाचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे त्यापैकी आतापर्यंत केवल ४७ टक्के म्हणजेच ६७ लाख टनांवर खरिपाचा पेरा झाला, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली. 

राज्यात यंदा माॅन्सून उशीरा दाखल झाला. त्यामुळे बहुतांशी भागात माॅन्सूनच्या सरीही उशीरा सुरु झाल्या. पाऊस उशीरा सुरु झाल्याने पेरण्यांची गतीही कमी आहे. तसेच पाऊस उशीरा दाखल होणार असल्याने मूग आणि उडीद लागवडीवर परिणाम होत आहे. तर शेतकरी सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकाला प्राधान्य देत असल्याचे दिसते. यंदा खरिपात पेरणीसाठी १४२ लाख हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी आतापर्यंत ६६ लाख ६७ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली. म्हणजेच आतापर्यंत एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी केवळ ४७ टक्के क्षेत्रावर लागवड झाली, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.


उसासह खरिप क्षेत्राचा विचार करता, यंदा १५३ लाख हेक्टर क्षेत्र खरिपासाठी उपलब्ध आहे. तर उसासह ६७ लाख ३१ हजार हेक्टरवर लागवड झाली. म्हणजेच एकूण क्षेत्राच्या केवळ ४४ टक्क्यांवर लागवड झाली. मागील हंगामात खरिपात ऊस वगळता  ७२ लाख ४२ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. म्हणजेच ६९ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता.

माॅन्सूनचा पाऊस कमी होत असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. देशात १० जुलैपर्यंत केवळ ७२ टक्के पाऊस झाला होता. राज्यात धान्यपिकांची केवळ १३ लाख हेक्टरवर लागवड झाली. मागील हंगामात याच काळात ५६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. तेलबिया पिकांचा विचार करता मागील हंगामात ४४ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. तर यंदा केवळ २६ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाखाली आले. कापूस लागवडीचा विचार करता, मागील हंगामात ४२ लाख हेक्टरवर लागवड होती. यंदा मात्र केल २८ लाख हेक्टर पीक कापसाखाली आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT