Loan Supply  Agrowon
ताज्या बातम्या

Loan Supply : ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ला ‘केडीसीसी’ करणार कर्जपुरवठा

जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक -युवतींच्या हाताला उद्योग वाढीतून रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँक आता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गतही कर्जपुरवठा करणार आहे.

Team Agrowon

कोल्हापूर : जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक -युवतींच्या हाताला उद्योग वाढीतून रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँक (Bank) आता मुख्यमंत्री (Chief Minister) रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गतही कर्जपुरवठा (Loan Supply) करणार आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. या योजने अंतर्गत उत्पादन व सेवा या दोन क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल.

महाराष्ट्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत कृषी पूरक व्यवसाय कृषी आधारित उद्योग आदी वाहतूक सेवा उद्योग यामधील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधींचा विचार केला आहे.

या योजनेअंतर्गत वित्तपुरवठा करण्यासाठी यापूर्वी सरकारी बँका, तसेच काही खासगी क्षेत्रातील शेड्यूल्ड बँकांचा समावेश होता. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्हा बँकेचाही समावेश नव्याने झाला आहे.

या योजनेमध्ये पाच ते सात वर्षांच्या मुदतीने कर्ज व खेळत्या भांडवलासह रुपये ४० लाखापर्यंत वित्तपुरवठा होईल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहरी भागात १५ टक्के व ग्रामीण भागात २५ टक्के अनुदान मिळेल. अनुसूचित जाती -जमातीसह महिला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गासाठी शहरी भागात २५ टक्के, ग्रामीण भागात ३५ टक्के अनुदान मिळेल.

या बैठकीत दुसरा महत्त्वाचा निर्णयही झाला. जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांना नाबार्डच्या ‘बहुउद्देशीय सेवा केंद्र’ या योजनेतील गुंतवणुकीचा फायदा मिळावा म्हणून धोरणात शिथिलता केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विकास संस्थांना स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल.

खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप माने, संतोष पाटील, सुधीर देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT