MPKV Agrowon
ताज्या बातम्या

MPKV Rahuri : संयुक्त कृषी संशोधन, विकास समितीची उद्यापासून बैठक

Joint Agricultural Research : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारपासून (ता. २५) शनिवार (ता. २७ मे) या कालावधीत ५१ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक (जॉइंट अॅग्रेस्को) होत आहे.

Team Agrowon

Nagar News : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारपासून (ता. २५) शनिवार (ता. २७ मे) या कालावधीत ५१ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक (जॉइंट अॅग्रेस्को) होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकारी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व अन्य अधिकारी उपस्थित असतील. या बैठकीत चारही कृषी विद्यापीठातून २० वाण, १३ यंत्रे, २३३ शिफारशी मांडण्यात येणार आहेत.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील संशोधनाबाबत चर्चा करून मान्यता देण्यात येण्यासाठी दरवर्षी एका कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक (जॉइंट अॅग्रेस्को) घेतली जाते. या बैठकीत चारही कृषी विद्यापीठाच्या विविध पिकांच्या वाणांना, संशोधन तंत्रज्ञानाच्या शिफारशींना तसेच सुधारित अवजारांना चर्चेअंती मान्यता देण्यात येईल.

यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे ५ वाण, फळ पिकाचे १ वाण, ३ यंत्रे व ७४ शिफारशी, दापोली कृषी विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे २ वाण, फळ पिकाचे १ वाण व ३८ शिफारशी, परभणी कृषी विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे ४ वाण, फळ पिकांचे २ वाण, ५ यंत्रे व ४६ शिफारशी, अकोला कृषी विद्यापीठाच्या शेत व चारा पिकांचे ३ वाण, फळ पिकांचे २ वाण, ५ यंत्रे व ७५ शिफारशी अशा एकूण २० वाण, १३ यंत्रे व २३३ शिफारशी मांडून त्यावर चर्चा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञान शिफारशी फायदेशीर ठरणार आहेत.

गुरुवारी (ता. २५) मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित बैठकीचे उद्‌घाटन होणार असून, महसूलमंत्री विखे पाटील व कृषिमंत्री सत्तार, सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य उपस्थित राहतील. शनिवारी (ता. २७) बैठकीचा समारोप होईल.

समारोपास महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे, राम शिंदे, सत्यजित तांबे, प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्यासह अन्य विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT