Jaggery Market  Agrowon
ताज्या बातम्या

Jaggery Market : कोल्हापुरात गूळ सौदे पोलिसांच्या बंदोबस्त झाले सुरू; नव्या गुळाला काय दर मिळाला?

बाजार समितीत बुधवारी (ता. ८) पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले. यात गुळाला २००० ते ३८०० चा सरासरी भाव मिळाला.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः मजुरीत वाढ द्यावी तसेच नवीन माथाडी करार करावा या मागण्यासाठी सोमवारपासून (ता. ७) काम बंद केलेल्या माथाडींना निलंबित करावे तसेच बाहेरच्या गावातून माथाडी कामगार आणून सौदे सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

त्यानुसार येथील बाजार समितीत बुधवारी (ता. ८) पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे (Jaggery Deals) पूर्ववत सुरू झाले. यात गुळाला २००० ते ३८०० चा सरासरी भाव मिळाला.

जिल्ह्याधिकारी रेखावार यांनी घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन बाहेरगावचे माथाडी कामगार बोलवून काम करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार गडहिंग्लज, गांधीनगर, जयसिंगपूर मलकापूर येथील माथाडी कामगार बोलवले या माथाडीना मार्केट यार्डतील माथाडींकडून विरोध होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला.

तसेच माथाडी नेत्यांना मार्केट यार्डात बेकायदा जमाव करून नये यासाठी १४४ कलमही लागू केले. त्यानुसार सकाळी सातपासून गूळ सौद्यांना सुरुवात झाली.

एक दिवसात दहा हजार गूळ रव्यांची आवक झाली. दुपारी बारापर्यंत नव्याने आलेले व शिल्लक अशा ८० हजार गूळ रव्यांचे सौदे झाले. यात २००० ते ४२०० रुपये भाव मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

Maharashtra Drought Declaration: नव्याने १९ तालुके दुष्काळी

Agriculture PG Admission: पदव्युत्तर प्रवेशावरील तक्रारींवर कृषी परिषदेचा खुलासा

Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा

SCROLL FOR NEXT