Fruit Production  Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Production : फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी सुविधा देणार

केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

Team Agrowon

औरंगाबाद : केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाचे उत्पादन (Fruit Production) व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

केसर आंबा व सिट्रस पार्क उभारणीच्या सोमवारी (ता. ७) आढावा बैठकीत ते बोलत होते. केसर आंबा क्लस्टर विकासासाठी कार्यालय, कोल्ड स्टोअरेज आणि नर्सरीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. औरंगाबादचा केसर आंबा आणि जालन्याची मोसंबी या फळांना भौगोलिक मानांकन (GIS) मिळाले असल्याने या फळपीकाचे उत्पादन क्षेत्र वाढण्याबरोबरच निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाबरोबराच संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिट्रस इस्टेट पार्क उभारण्यात येत असल्याचे मंत्री भुमरे म्हणाले.

या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विकास मीना, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक, अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालासागर तौर, सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कारले, आंबा उत्पादक शेतकरी नंदू काळे, डॉ. भगवानराव कापसे आदींची उपस्थिती होती.

श्री. बागडे म्हणाले, की मराठवाड्यात केसर आंबा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. माळरान जमिनीवर रोहयोअंतर्गत खड्डेनिर्मिती करून आंब्याची लागवड केल्यास जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होऊ शकते. यासाठी शासनाच्या मालकीच्या पडीक जमिनीवर लागवड करण्याची सूचना केली.

करमाड येथील पणन मंडळाच्या जागेतील कोल्ड स्टोअरेज आंब्यासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बरोबरच औरंगाबाद येथे ‘आंबा महोत्सव’ आयोजन करून शेतकऱ्यांना या महोत्सवात जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे, असे सूचित केले. जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्‍नाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

इसारवाडी येथे सिट्रस इस्टेट पार्क...

पैठण तालुक्यात इसारवाडी येथे सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याबाबत जागेच्या प्रस्ताव शासनास सादर झाला आहे. कृषी विभागाची मान्यता देखील काही दिवसात येईल. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रोपवाटिका, अद्ययावत तंत्रज्ञान, विपणन तंत्र याचे प्रशिक्षण देऊन मोसंबीपासून अन्न पदार्थ तयार करण्याचे संशोधन या सिट्रस इस्टेट पार्कमध्ये करण्यात येणार आहे.

मराठवाड्यात मोसंबी उत्पादन वाढविण्याच्या हेतूने सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याचे निर्णय घेतल्याचा भुमरे यांनी सांगितले. सिट्रस इस्टेट पार्क उभारणी बाबतच्या प्रस्तावाच्या त्रुटींची पूर्तता करून सिट्रट इस्टेट पार्क सुरू करण्याचे प्रक्रियेला गती देण्याची निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी कृषी विभागाला दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT