Rajma Crop Production Agrowon
ताज्या बातम्या

Rajma Production : काटेकोर नियोजनातून राजमा पिकांची उत्पादकता वाढविणे शक्य’

राजमा लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी या पिकांच्या उत्पादनातील जोखमीच्या बाबी समजून घेणे गरजेचे आहे.

Team Agrowon

परभणी ः राजमा लागवडीसाठी (Rajma Cultivaton) इच्छुक शेतकऱ्यांनी या पिकांच्या उत्पादनातील जोखमीच्या बाबी समजून घेणे गरजेचे आहे. काटेकोर नियोजनातून राजम्याची उत्पादकता (Rajma Productivity) वाढविणे शक्य आहे. योग्य जमिनीची निवड, पिकांचा फेरपालट, वेळेवर कीड व्यवस्थापन (Pest Management), मळणीचे तंत्र या बाबींवर भर देणे गरजेचे आहे, असा सूर कृषी विज्ञान केंद्रातर्फे मंगळवारी (ता. ८) राजमा पीक लागवड तंत्रज्ञान शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात सहभागी शेतकरी, तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केला.

अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक पी. बी. बनसावडे, सातारा जिल्ह्यातील राजमा पिकासाठी जी. आय. मानांकन प्राप्त शेतकरी मधुकर कदम, अनिल ओळंबे, अंबाजोगाई येथील शिवप्रसाद येळकर, कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख, उद्यानविद्या विशेषज्ञ अमित तुपे, श्रीधर पवार आदी उपस्थित होते.

ओळंबे म्हणाले, की उच्च पोषणमुल्य असलेले राजमा हे परभणी-हिंगोली जिल्ह्यातील नवीन पीक आहे. त्यामुळे या पिकांतील धोके समजून घेत लागवड करावी. मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. २० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा कालावधी राजमा लागवडीसाठी किफायतशीर ठरतो. कदम म्हणाले, रब्बी हंगामात राजम्याचे चांगले उत्पादन मिळते. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे. काढणी करताना काळजी घ्यावी लागते. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT