Prakash Ambedkar Agrowon
ताज्या बातम्या

शिंदे गटासमोर विलीनीकरणाची अट: प्रकाश आंबेडकरांचा दावा

'एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?,' असे ट्विट आंबेडकर यांनी केले.

Team Agrowon

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचा आज तिसरा दिवस आहे. पण अद्याप त्यांनी भाजपसोबतच्या वाटचालीबाबत खुलासा केलेला नाही. पण शिंदे गट आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत संभ्रम असतानाच शिंदे यांना त्यांचा गट आधी विलीन करण्याची अट भाजपकडून घालण्यात आल्याचा दावा वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे आंबेडकरांनी म्हटले. पण त्यांनीही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून चर्चेला तोंड फोडले आहे. 'एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?,' असे ट्विट आंबेडकर यांनी केले.

शिंदे यांनी सुरूवातीपासूनच आपण शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी शक्यता आहे. ते वेगळा गट करूनच भाजपला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होतील, याचीच दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

शिंदे यांच्या बंडामागे भाजपची (BJP) आणि त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची फूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय आणि कशी भूमिका घेणार, याविषयी फडणवीस यांनी भाष्य केलेले नाही.

१२ खासदारांचाही शिंदेंना पाठिंबा ?

दरम्यान आमदारांच्या बंडखोरीची चर्चा असतानाच आता बारा खासदारही शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवसेनेचे १८ खासदार असून १२ खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असतील तर हा ठाकरेंसाठी आणखी मोठा धक्का असेल. त्यामुळे आता ठाकरे पुढे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT