Sangli DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Sangli DCC bank : जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच

Latest Agriculture News : शेती कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्याच्या कर्जाला तीन वर्षांसाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुक्रवारी (ता. १५) बँकेच्या सर्वसाधारण सभेत केली.

याशिवाय मृत शेतकऱ्याच्या दोन पाल्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल. शेती कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेला मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

येथील धनंजय गार्डनमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या वेळी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, मोहन कदम, विशाल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. दरम्यान यंदा १०० टक्के वसुली केलेल्या सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

जिल्हा बँकेकडे ६ हजार ९७१ कोटींच्या ठेवी आहेत. सहा हजारांपर्यंत कर्जवाटप असून वर्षभरात १३ हजार कोटींचा व्यवसाय केला आहे. स्वनिधी ९३७ कोटींचा असून सी.आर.ए.आर. ११.५७ टक्के आहे.

चालू वर्षी १३४ कोटींचा ढोबळ नफा मिळाला. यंदा ५ टक्के एनपीए आला असून पुढील वर्षी एनपीए शून्य टक्के करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे, असे नाईक यांनी सांगितले.

शासनाने १५७५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र बँकेने त्याबाहेर जाऊन १६६० कोटी रुपये इतके उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले. जिल्ह्यातील २३ सोसायट्यांना १८.५३ कोटी रुपयांचे ड्रोन हार्व्हेस्टिंगसाठी कर्ज देण्यात आले. केंद्र सरकारने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून ६८० सोसायटी संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना सॉफ्टवेअर देण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले.

‘ओटीएस’ला मुदतवाढ

शेती कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी २०२० मध्ये एकरकमी वसुली योजना सुरू केली. जिल्ह्यातील २० हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले. अद्याप अनेक शेतकऱ्यांची थकबाकी कायम आहे, त्यामुळे उर्वरित शेतकरी ‘ओटीएस’मध्ये सहभागी होण्यासाठी मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT