Water Management Agrowon
ताज्या बातम्या

Water Management : पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्याची ‘जलव्यवस्थान’ची सूचना

ग्रामीण भागात सुरू असलेल्या प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे. या पार्श्वभूमीवर वसुलीसाठी पथके तयार करून पाणीपुरवठा योजनांच्या थकीत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याबाबत सांगण्यात आले.

Team Agrowon

अकोला : येत्या काळात जिल्ह्यात तयार होणारी संभाव्य पाणीटंचाई (Water Shortage) पाहता निवारण उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना गुरुवारी (ता. दोन) झालेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन (Water Management) व स्वच्छता समितीच्‍या सभेत अध्यक्षा संगीता अढाऊ यांनी केली. तयार होणारा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशही दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आगामी दिवसात होणाऱ्या पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

त्यानंतर त्यांनी कृतिआराखडा तत्काळ बनविण्याचे निर्देश दिले. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील मंजूर योजनांच्या कामांपैकी किती कामे पूर्ण करण्यात आली व किती कामे सुरू आहेत, याचीही माहिती घेतली.

या बैठकीसाठी महावितरण तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाचे अधिकारी अनुपस्थित राहल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून माहिती कळविण्याबाबत संगीता अढाऊ यांनी सूचित केले.

आढावा सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाईक, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुख्तार, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात सुरू असलेल्या प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे. या पार्श्वभूमीवर वसुलीसाठी पथके तयार करून पाणीपुरवठा योजनांच्या थकीत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याबाबत सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT