ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी

कृषी विभागातर्फे कृषी सहायक छाया शिंदे, तर महसूल विभागातर्फे तलाठी मुंगळे व कोतवाल गणपत भांडलकर यांनी शुक्रवारी (ता.५) अतिवृष्टीमुळे बटाटा व सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान तसेच पडलेल्या घरांची व गोठ्याची पाहणी केली.

टीम ॲग्रोवन

पारगाव, जि. पुणे ः शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतीची (Agriculture Damage) तसेच पडलेल्या घरांची, गोठ्यांची (Cowshed) पाहणी शनिवारी (ता. ६) कृषी विभाग (Agriculture Department) तसेच महसूल विभागाकडून करण्यात आली.

कृषी विभागातर्फे कृषी सहायक छाया शिंदे, तर महसूल विभागातर्फे तलाठी मुंगळे व कोतवाल गणपत भांडलकर यांनी शुक्रवारी (ता.५) अतिवृष्टीमुळे बटाटा व सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान तसेच पडलेल्या घरांची व गोठ्याची पाहणी केली. या वेळी उपसरपंच मयूर सरडे, शेतकरी गणेश तांबे, निवृत्ती तांबे, राघू रणपिसे, तात्याभाऊ चौधरी, निखिल तांबे, विक्रम तांबे आदी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर लवकरच याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल, असे छाया शिंदे व मुंगळे तलाठी यांनी सांगितले. तसेच, लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे सरपंच वंदना तांबे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT