Swachhata Mission Agrowon
ताज्या बातम्या

Gram Swachhata Abhiyan : श्रीरामपूर, बामखेड्यात विभागीय समितीकडून पाहणी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली होती.

टीम ॲग्रोवन

नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२०-२१ व २२ (Sant Gadagebaba Gram Swachhata Abhiyan) अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या बामखेडा (ता. शहादा) व श्रीरामपूर (ता. नंदुरबार) या गावांना विभागीय समितीने भेट देऊन ग्रामपंचायतींनी राबविलेल्या विविध स्वच्छता उपक्रम आणि सांडपाणी (Waste Water), जल व्यवस्थापन (Water Management) प्रकल्पांची तपासणी केली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली होती. त्यानंतर जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम व द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतीची निवड विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरिता करण्यात येते.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरिता श्रीरामपूर व बामखेडा तत यांची निवड केली आहे. या ग्रामपंचायतीची विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे उपायुक्त (विकास), मनोजकुमार चौधर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने तपासणी केली. यात विस्तार अधिकारी अनिल राणे, दीपक मोरे यांचा समावेश होता.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) तथा गट विकास अधिकारी जयवंत उगले, शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील पाटील, उप अभियंता पांडुरंग दरेवार, विस्तार अधिकारी मनोज देव, भय्यासाहेब निकुंभ, अरुण वरसाळे, अभियंता हरिश भोई, महेंद्र नाईक, श्रीरामपूरचे सरपंच यशवंत गांगुर्डे, ग्रामसेविका रूपाली देवरे, ग्रामसेवक मनीष रामोळे, उपसरपंच उखा भिल आदी उपस्थित होते.

विविध विकासकामांची तपासणी

समिती अध्यक्ष मनोजकुमार चौधर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. यानंतर समितीने शाळा, अंगणवाडी, सखी प्रेरणा भवन, हॅण्डवॉश स्टेशन, फुलपाखरू गार्डन, पिण्याचे पाण्याचे स्रोत, गोबर गॅस, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT