Paddy Farming Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Cultivation : भाताच्या लागवडीवर महागाईचे सावट कायम

Paddy Farming : भात पिकाचे आगर असलेल्या इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे भात पिकाच्या लागवडीला जोमाने सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : भात पिकाचे आगर असलेल्या इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे भात पिकाच्या लागवडीला जोमाने सुरुवात झाली आहे. भात लागवडीसाठी लागणाऱ्या साधनांची, बियाण्याची व खतांची खरेदी करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. मात्र महागाईमुळे भाताची लागवड आता महाग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यात खरीप हंगामात पारंपरिक भात पिके घेण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. पारंपरिक भाताच्या बियाण्याला बगल देऊन नवनवीन व संकरित बियाण्याची लागवड करून कमी वेळेत जास्तीतजास्त उत्पन्न घेण्यावरही अधिक भर आहे.

तालुक्यात पशुधनात लक्षणीय घट झाल्याने शेतीच्या मशागतीसह पेरणीसाठी तालुक्यातील शेतकरी यंत्र व ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. डिझेलच्या दरात वाढ झाली नसली तरी भाव तोच कायम असल्याने पूर्वी ५०० ते ६०० रुपये प्रतितास भाड्याने मिळणारा ट्रक्टर आता ओल्या मशागतीसाठी ७०० ते ९०० तर चिखलासाठी ८०० ते हजार रुपये प्रतिताशी दर आहे. याचबरोबर पशुधन घटल्याने बैलाचे औत रोजावर मजुरीने मिळणे दुर्मीळ झाले आहे. दोन वर्षापूर्वी २५० रुपये रोजाने मिळणारे औत ५०० रुपये प्रतिदिवसाची मजुरी देऊनही मिळत नाही.

दरम्यान गेल्या तीन ते चार वर्षापासून कमी वेळेत उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी शेतात बाजारात नवनवीन दाखल होणाऱ्या संकरित बियाण्याच्या लागवडीला प्राधान्य दिल्याने. या संकरित बियाण्याच्या उत्पन्नात भाताची भेसळ अधिक प्रमाणात येत असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी सुधारित बियाणे खरेदी करावे लागत आहे. बियाण्याच्या किमतीतही दरवर्षी भुर्दंड बसत आहे.

महागडी बियाणे, खते, औजारे, व साहित्य खरेदी करून महागाईला तोंड देऊन पेरणी केलेली शेतातून उत्पन्न घेण्यासाठी नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करावे लागते. भाताची पेरणी, लागवड, निंदणी, सोंगणी यासाठी भरमसाट मजुरी द्यावी लागते. परिणामी यातून शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पानघोंगडेही झाले महाग

भात पिकाच्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या पानघोंगडे (इरने) तसेच लोकरीपासून तयार होणारी घोंगडी यांच्याही किमतीत यावर्षी भरमसाट वाढ झाली आहे. बांबूच्या लाकडापासून तयार होणारा पान घोंगड्याचा साठा पूर्वी ६० ते ७० रुपयांना मिळत होता. हाच साठा आता १५० ते २०० रुपयांना मिळत आहे. तर घोंगड्याच्या किमतीत या वर्षी दुप्पट वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT