Humani Pest  Agrowon
ताज्या बातम्या

Humani Pest : मोहोळमधील उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव

Sugarcane Pest : गेल्या साडेतीन महिन्यांपासून पाऊस नाही. त्यामुळे शेतीला पाणीटंचाई जाणवत आहे. शेतीमालाला दर नाही. पाऊस नसल्याने उसाची वाढ झालीच नाही.

Team Agrowon

Solapur News : गेल्या साडेतीन महिन्यांपासून पाऊस नाही. त्यामुळे शेतीला पाणीटंचाई जाणवत आहे. शेतीमालाला दर नाही. पाऊस नसल्याने उसाची वाढ झालीच नाही. अशा संकटांचा शेतकरी सामना करत असतानाच आता शेतात उभ्या असलेल्या उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने उसाची बेटे उन्मळून पडत आहेत. शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे ठाकले आहे.

पावसाळा सुरू होऊन सुमारे साडेतीन महिने झाले आहेत. एकाही नक्षत्रात दमदार पाऊस पडला नाही. आता भरवशाची म्हणले तर उत्तरा व हस्त ही दोन नक्षत्रे राहिली आहेत. सध्या उत्तरा नक्षत्र सुरू आहे.

पाऊस नसल्याने विहिरींची व बोअरची पाणी पातळी खालावली आहे. भरीस भर म्हणून उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. काही शेतकऱ्यांनी उसाला ठिबक सिंचन केले, तर काहींनी नाही. त्यातच उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे.

शेतात उभ्या असलेल्या उसाच्या बेटाच्या मुळ्या बुडातून कांडरल्याने बेटे उन्मळून पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

पाऊस नसल्याने अगोदरच उसाच्या वजनात मोठी घट झाली आहे, नव्या संकटामुळे वजनात पुन्हा जास्तच घट होणार आहे. शेतकऱ्यांच्या संकटात नव्याने भर पडली आहे.

मेटारायझियम यासारख्या जैविक कीडनाशकाचा वापर शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.
- डॉ. पंकज मडावी, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ
माझा मुळातच एक एकर ऊस आहे, त्यातील अर्धा एकर ऊस हुमणीमुळे प्रादुर्भावग्रस्त झाला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- धनाजी लोंढे, ऊस उत्पादक शेतकरी, पापरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT