soybean rate  agrowon
ताज्या बातम्या

Soybeans : नाफेडला सोयाबीन मिळणार नसल्याचे संकेत

सोयाबीन खरेदीसाठी नाफेडमार्फत जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

Team Agrowon

अमरावती : सोयाबीन खरेदीसाठी (Soybean Procurement) नाफेडमार्फत (NAFED) जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र अद्याप यातील कोणत्याही केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसून यंदाही सोयाबीनची शासकीय खरेदी होणार नसल्याचे चित्र आहे. खुल्या बाजारात सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक भाव असल्याने हे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होती. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. तसेच पिकांची प्रतवारी व सरासरी घसरली आहे. तरी काही भागात सरासरी चांगली आली आहे. बाजारात सोयाबीनची अल्प आवक असून खेडा खरेदीचा खुल्या बाजारावर परिणाम झाला आहे.

सद्यःस्थितीत येथील बाजार समितीत ८ ते १० हजार पोत्यांची आवक आहे. ५ हजार ते ५३३५ रुपये भाव आहे. सोयाबीनचे भाव अजूनही सहा हजारांवर गेलेले नाहीत. जिल्ह्याबाहेरील काही बाजार समितीत सहा हजारांवर भाव गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात पसंती दिली आहे. याशिवाय यंदा प्रतवारी घसरल्याने बियाण्यांसाठी उच्च दर्जाच्या सोयाबीनची कमतरता आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांनी व स्टॉकिस्टने खेडा खरेदी सुरू करीत हमीदरापेक्षा अधिकभाव दिला आहे.

दरम्यान, नाफेडने सोयाबीनच्या खरेदीसाठी ४३०० रुपये या हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात चौदा शासकीय केंद्र सुरू केले आहेत. नोंदणी सुरू झाली असून, अद्याप अमरावती जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने या केंद्रांवर नोंदणी केलेली नाही.

गतवर्षी सोयाबीनला १० हजारावर उच्चांकी भाव मिळाला होता. यंदा अद्याप भाव चढलेले नसले तरी स्टॉकिस्ट व बियाणे कंपन्या आतापासूनच बाजारात आल्याने सोयाबीनचे भाव वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने यंदाही शासकीय खरेदी होणार नसल्याचे चित्र आहे.

अशी आहेत शासकीय केंद्रे

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन : चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर, खरेदी विक्री संघ, जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्था पथ्रोट व नेरपिंगळाई येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी.

विदर्भ मार्केटिंग फेडरेशन : मोर्शी, वरूड, धामणगावरेल्वे, अमरावती, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, येवदा व करजगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT