Milk Prices Agrowon
ताज्या बातम्या

Indian Dairy Festival : कोल्हापुरात शुक्रवारपासून इंडियन डेअरी फेस्टिव्‍हल

दूध परिषदेचे सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल.

Team Agrowon

कोल्हापूर : सहकारी व खासगी दूध संघांनी (Milk Organization) संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिव्हलला (Indian Dairy Festival) शुक्रवारपासून (ता. २०) प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी (Hotel Sayaji) येथे दूध परिषद (Milk Conference) होत आहे.

दूध परिषदेचे सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल.

या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे निमंत्रक गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली.

दुपारी तीन वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रामध्ये पशुसंवर्धनाचे नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र होईल. संध्याकाळी चार वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी पाच वाजता दूध परिषदेचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT