cold weather  Agrowon
ताज्या बातम्या

Clod Weather : थंडीत वाढ, सकाळी धुक्याची शक्‍यता...

महाराष्ट्रावर रविवारी १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कलपर्यंत हवेचा दाब कायम राहील. त्यामुळे तापमान घसरेल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

महाराष्ट्रावर रविवारी १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब (Air Pressure) राहील. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कलपर्यंत हवेचा दाब कायम राहील. त्यामुळे तापमान घसरेल.

त्यानंतर बुधवारी १०१२ हेप्टापास्कल हवेचा दाब होत असल्याने किमान तापमानात (Minimum Temperature) किंचित वाढ होईल. थंडीचे (Cold Weather) प्रमाण कमी होईल. ८ जानेवारी ते १० जानेवारी या दिवसात थंडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याने पिके आणि जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

१३ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १०१२ तर दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल हवेचा दाब होताच थंडीचे प्रमाण कमी होईल, किमान तापमानात किंचित वाढ झालेली असेल.

या आठवड्यात राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी ६ ते ९ या वेळेत धुक्‍याचे प्रमाण जाणवेल. फार मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. मात्र मुंबई, दिल्ली, पुणे यासारख्या मोठ्या शहरात अधिक धुक्‍याचे प्रमाण जाणवून श्‍वसनास त्रास होण्याची शक्यता आहे.

कांदा व इतर पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढणे शक्‍य आहे. अरबी समुद्र व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सरासरी पेक्षा अधिक राहील, ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.

मात्र बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. हवामान कोरडे व थंड राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहिल्यामुळे थंडी कायम राहील.

१) कोकण ः

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस व किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील; तर रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस व किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील.

रायगड जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, ठाणे व पालघर जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ५५ ते ६२ टक्के राहील.

रायगड व ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आद्रता २९ ते ३० टक्के राहील; तर रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३३ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

२) उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील; धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ५० ते ५५ टक्के; दुपारची सापेक्ष आद्रता ३१ ते ३२ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. धुळे, नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयकडून तर नाशिक, जळगाव जिल्ह्यात इशान्येकडून राहील.

३) मराठवाडा ः

उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. जालना,औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील.

उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता सर्वच जिल्ह्यात ५० ते ५८ टक्के राहील. जालना, औरंगाबाद जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आद्रता ३१ ते ३३ टक्के राहील.

उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आद्रता २६ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात इशान्येकडून राहील.

४) पश्‍चिम विदर्भ ः

बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलडाणा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ५२ टक्के, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ४८ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आद्रता सर्वच जिल्ह्यात ३० ते ३१ टक्के असेल.

हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.

५) मध्य विदर्भ ः

चंद्रपूर, वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ३७ ते ४८ टक्के, दुपारची सापेक्ष आद्रता २४ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी व दिशा इशान्येकडून राहील.

६) पूर्व विदर्भ ः

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस पर्यंत घसरेल. चंद्रपूर जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता सर्वच जिल्ह्यात ४० ते ४८ टक्के राहील; दुपारची सापेक्ष आद्रता गोंदिया जिल्ह्यात ११ टक्के, भंडारा जिल्ह्यात १६ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात २१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ राहील व दिशा इशान्येकडून राहील.

७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः

सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, पुणे, नगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील.

नगर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ६० ते ६२ टक्के राहील. सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ५० ते ५७ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आद्रता सर्वच जिल्ह्यात २५ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील.

कृषी सल्ला ः

१) खरबूज व टबूज लागवडीस सुरवात करावी.

२) बागायती क्षेत्रात उन्हाळी भुईमूग, तीळ, बाजरीची पेरणी करावी.

३) कुक्कुटपालन शेडमध्ये थंडीच्या काळात योग्य तापमान ठेवावे.

४) पिकांना सायंकाळी पाणी द्यावे, त्यामुळे जमिनीचे तापमान योग्य राहते.

५) जनावरांना गोठ्यात थंडी वाजणार नाही,याची काळजी घ्यावी.

६) आंबा मोहोराचे संरक्षण करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT