Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्याच्या किमान तापमानात वाढ

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा १० अंशांच्या खाली असल्याने गारठा कायम आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (Temperature) चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा १० अंशांच्या खाली असल्याने गारठा (Cold) कायम आहे. तर उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. ४) राज्यात कोरड्या हवामानासह, तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी अधिक होत आहे. राजस्थानातील चुरू येथे शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभाव, किमान तापमानात झालेली वाढ, यामुळे थंडी ओसरली आहे. यातच दिवसा मुख्यतः निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.

शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे ९.८ तापमान नोंदविले गेले. तर सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४.२ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, बहुतांशी ठिकाणी पारा १३ ते २२ अंशांच्या दरम्यान तर कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

उपसागरात उद्या कमी दाब क्षेत्र निर्मितीचे संकेत

बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात आज (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात उद्यापर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत (ता. ७) ही प्रणाली तीव्र होऊन तमिळनाडू, पद्दूचेरीच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.६ (१४.९), जळगाव ३१ (१३.२), धुळे ३० (९.५), कोल्हापूर ३०.६ (२१.५), महाबळेश्‍वर २७.७ (१६.२), नाशिक ३०.७ (१२.८), निफाड २९.९ (९.८), सांगली ३०.९ (२०.२), सातारा २९.९(१९.८), सोलापूर ३२.८ (१९.५), सांताक्रूझ ३४.२(१९.२), डहाणू ३०.४ (१७.८), रत्नागिरी ३४.० (२२.६), औरंगाबाद ३०.२ (१३.४), नांदेड - (१७.४), उस्मानाबाद ३०.६ (१७.०), परभणी ३०.९ (१६.६), अकोला ३१.४ (१६.८), अमरावती ३१.२ (१५.१), बुलडाणा २९.८ (१६.५), ब्रह्मपुरी ३२.२ (१६.८), चंद्रपूर २९.२ (१८.२), गडचिरोली ३० (१३.४), गोंदिया २८.६ (१३.२), नागपूर २९.६ (१४), वर्धा ३० (१५.४), यवतमाळ ३०.२ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT