Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पहाटे हुडहुडी, दुपारी घामटा

राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पहाटेच्या किमान तापमानात घट होत असल्याची परस्पर विरोधी हवामान स्थिती सध्या राज्यात अनुभवायला मिळत आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात (Temperature) मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पहाटेच्या किमान तापमानात घट होत असल्याची परस्पर विरोधी हवामान (Weather) स्थिती सध्या राज्यात अनुभवायला मिळत आहे.

परिणामी पहाटे गारठा (Cold Weather) तर दुपारी उन्हाच्या तीव्र झळांमुळे घामटा निघत आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी पारा पस्तिशीपार जात आहे. तर पहाटेच्या वेळी किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात हुडहुडी कायम आहे.

मंगळवारी (ता. १४) रत्नागिरी येथे देशातील येथे उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात झालेली घट कायम आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६.२ अंश, जळगाव ७.५, औरंगाबाद ८.१ तर पुण्यात ९.३ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानातही घट झाली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमान पस्तिशी पार आहे. सांताक्रुझ येथे ३७.३ अंश, सोलापूर येथे ३५.६ अंश सेल्सिअस तापमानानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतातील राज्याच्या किमान तापमानातही सातत्याने चढ-उतार सुरूच असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी (ता. १४) राजस्थान येथील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १५) राज्याच्या तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (९.३), जळगाव ३२.४ (७.५), धुळे ३१.०(६.२), कोल्हापूर ३३.०(१७.६), महाबळेश्वर २९.६ (१४.५), नाशिक ३०.९ (१०.७), निफाड ३२.१(६.१),

सांगली ३४.४ (१४.८), सातारा ३३.० (१३.५), सोलापूर ३५.६ (१४.४), सांताक्रूझ ३७.३ (१९.०), डहाणू ३२.५ (१६.९), रत्नागिरी ३८.३(१७.९), औरंगाबाद ३३.० (८.१), नांदेड ३३.८ (१४.२), परभणी ३३.७(११.६), अकोला ३३.८ (१०.५),

अमरावती ३२.०(१०.४), बुलढाणा ३०.६(१३.२), ब्रह्मपूरी ३१.४ (१४.०), चंद्रपूर ३१.०(१२.८), गडचिरोली ३१.०(११.६), गोंदिया २९.८ (१०.२), नागपूर ३१.८ (१०.७), वर्धा ३२.५(१२.०), यवतमाळ ३१.० (१०.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cadre Structure Cancellation: आकृतिबंध अखेर रद्द; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Government Inquiry: माजी सचिवांची चौकशी होणार

Pulses Market: अकोला बाजरात तूर, हरभरा दरवाढीचा कल

Heavy Rain Alert: उत्तर महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT