Weather Udpate Agrowon
ताज्या बातम्या

weather Update : विदर्भात उन्हाचा ताप अधिक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उन्हाची ताप अधिक असल्याने ब्रह्मपूरी आणि अकोला येथे तापमानाचा पारा ३८ अंशांपार पोचला आहे.

Team Agrowon

Weather Update Maharashtra पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा (Heat) चटका कायम आहे. विदर्भात उन्हाची ताप (Vidarbh Heat) अधिक असल्याने ब्रह्मपूरी आणि अकोला येथे तापमानाचा पारा ३८ अंशांपार पोचला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान (Temperature In Marathwada) वाढत आहे. आज (ता. २५) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

सुर्य तळपत असतानाच स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या अनेक भागात उन्हाची ताप वाढत आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ३८.२ तर अकोला येथे ३८.१ अंश तापमानाची नोंद झाली.

सोलापूर आणि वाशीम येथे ३७ अंशांपेक्षा अधिक, तर वर्धा, अमरावती, रत्नागिरी, परभणी, आणि सातारा येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ असली तरी किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. शुक्रवारी (ता. २५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात मात्र बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.१ (१२.०), जळगाव ३५.८ (१०.०), धुळे ३४.०(१०.२), कोल्हापूर ३४.६ (२०.२), महाबळेश्वर ३१.६ (१७.९), नाशिक ३५.५ (१२.८), निफाड ३५.८(८.८), सांगली ३५.८ (१८.१), सातारा ३६.३ (१५.२), सोलापूर ३७.६ (२०.५),

सांताक्रूझ ३४.७ (१९.६), डहाणू ३०.२ (१९.२), रत्नागिरी ३६.८ (१९.८), औरंगाबाद ३५.५ (११.८), नांदेड - (१६.८), परभणी ३६.६(१४.६), अकोला ३८.१ (१४.०), अमरावती ३६.८(१४.९), बुलढाणा ३४.८(१८.८),

ब्रह्मपूरी ३८.२ (१६.५), चंद्रपूर ३५.६ (१६.२), गडचिरोली ३२.८(१४.४), गोंदिया ३५.८ (१५.२), नागपूर ३५.८ (१५.२), वर्धा ३६.९(१७.०), वाशीम ३७.२ (१५.४), यवतमाळ ३५.२ (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT