DCC Bank Satara Agrowon
ताज्या बातम्या

Satara DCC Bank : मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ ः नितीन पाटील

सातारा : जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीदारांना उत्तम व्याज परतावा मिळावा, यासाठी मुदत ठेवीवरील व्याजदरात भरीव वाढ केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Satara DCC Bank) ठेवीदारांना उत्तम व्याज परतावा मिळावा, यासाठी मुदत ठेवीवरील व्याजदरात भरीव वाढ केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांनी दिली.

अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ‘‘बँकेचे १८१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी ५.५० टक्के, १ वर्ष ते १० वर्षांपर्यंत ६.५० टक्के दराने मुदत ठेवीवर व्याजदर लागू केले आहेत. दामदीडपट ठेवीचा कालावधी ७५ महिने १४ दिवस असून, अन्य मुदत ठेवीवरील व्याजदराप्रमाणेच या ठेवींनाही ज्येष्ठ नागरिकांसाठी १ टक्का जादा व्याजदराचा लाभ देण्यात आला आहे.

ग्राहकांना एनईएफटी, आरटीजीएस, एटीएम, रूपे डेबिट कार्ड, एसएमएस अलर्ट, बीटीएल, आयएमपीएस, बीबीपीएस, इंटरनेट बँकिंग, युपीआय, मोबाईल आयएमपीएस, लघू व्यावसायिकांसाठी क्यू आरकोड आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बँक ठेवीदारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभ देत आहे.

यासाठी दोन लाख विमा संरक्षणासाठी प्रीमिअम बँक स्वनिधीतून भरत आहे. जिल्ह्यातील बँकेच्या ३०७ शाखा व १२ विस्तारित कक्षाद्वारे ग्राहकांची सेवा बँक करत आहे. बँकेचे सर्व ठेवीवरील व्याजदर आकर्षक असून पाच लाखापर्यंतचे सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने ठेवी व कर्जाच्या अनेकविध योजना आखल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या नजीकच्या शाखेत विविध ठेव योजनेत गुंतवणूक करावी, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे. बँकेच्या कामकाज अनुषंगाने विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT