Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे हुडहुडी

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट महाराष्ट्राकडे झेपावल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, निफाडमध्ये राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट (Cold Wave) महाराष्ट्राकडे झेपावल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, निफाडमध्ये राज्याचे हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची (Low Temperature) नोंद झाली आहे. आज (ता. १०) उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट तर मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

गेले काही दिवस असलेले धुके आणि ढगाळ वातावरण दूर झाले असून, उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट आली आहे. सोमवारी (ता. ९) अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांवर घसरला. तर कोकण वगळता जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान १३ अंशांच्या खाली होते.

एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावतांमुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. ९) मध्य प्रदेशातील नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १०) महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उत्तर कर्नाटक या राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतासह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे २८.६ (८.६), जळगाव - (५), धुळे २७ (५), कोल्हापूर २८.८ (१५), महाबळेश्वर २३.५(११.५), नाशिक २६.८ (८.७), निफाड २६.३ (५), सांगली २८.८ (१३.१), सातारा २७.३(११.९),

सोलापूर ३१.४ (१२), सांताक्रूझ ३२.८ (१९.४), डहाणू ३२.२ (१७.३), रत्नागिरी ३३.३ (१९.५), औरंगाबाद २८.८ (५.८), नांदेड - (१०.६), उस्मानाबाद - (८.५), परभणी २८.५ (९.५), अकोला ३०.५ (१०.४), अमरावती २९.२ (९.९), बुलडाणा २७ (१०), ब्रह्मपुरी २९ (१०.४), चंद्रपूर २६.६ (१०), गडचिरोली २३.४(९.६), गोंदिया २७.५(७), नागपूर २८.३ (८.५), वर्धा २८ (९.९), यवतमाळ २७.५ (८.५).

थंडीची तीव्र लाट (ऑरेंज अलर्ट) : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक. थंडीची लाट (येलो अलर्ट) : पुणे, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, यवतमाळ, नागपूर, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT