Shednet Agrowon
ताज्या बातम्या

Shednet : शेडनेटधारक शेतकऱ्यांचा ‘कर्जमाफी’त समावेश करा

आमदार समाधान आवताडे यांची मागणी

Team Agrowon

सोलापूर ः महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून (Mahatma Phule Loan Waiver Scheme) वगळलेल्या शेडनेटधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली.

नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार आवताडे यांनी हा प्रश्न मांडला. पंढरपूर, मंगळवेढ्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेडनेट उभारले आहे. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. त्या कर्जासाठी जमिनी गहाणखत ठेवल्या आहेत.

परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हे सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या तोट्यात आले आहेत. परिणामी घेतलेले कर्ज हे शेतकरी भरू शकत नाहीत. आता वाढत्या कर्जाच्या बोजामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. बँका थेट शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शेडनेटधारक शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतही बसत नाहीत, त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

पण या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. एकट्या मंगळवेढ्यातील ८० शेतकरी आहेत. तरी शासनाने या सर्व बाबींचा विचार करून या शेतकऱ्यांचा समावेश महात्मा फुले कर्जमाफी योजनेत करावा, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT