Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : यवतमाळ जिल्ह्यात १,८३५ उमेदवार रिंगणात

शंभर ग्रामपंचायतींत प्रचाराचा धुरळा

Team Agrowon

यवतमाळ : जिल्ह्यात शंभर ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शंभर सरपंचपदांसाठी २९७ व ७७६ सदस्यांसाठी एक हजार ५३८ असे एकूण एक हजार ८३५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे ठाकले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात १२, आर्णीत सात, झरी जामणी चार, मारेगाव नऊ, उमरखेड चार, नेर एक, दारव्हा आठ, घाटंजी सहा, यवतमाळ १६, राळेगाव आठ, दिग्रस पाच, वणी १९ व बाभूळगाव एक अशा एकूण शंभर ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. शंभर ग्रामपंचायतींत ३०८ प्रभाग आहेत. त्याच सरपंच संख्या शंभर तर सदस्य संख्या ७७६ आहे. सरपंचपदासाठी एकूण ३८६ नामनिर्देशन तर सदस्यांसाठी एक हजार ७१३ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. त्यात सरपंचाचे सहा तर सदस्यांचे १९ नामनिर्देशन अवैध ठरविण्यात आली. त्यात वैध ठरलेल्यांपैकी ८३ सरपंचपदाच्या व १५६ सदस्यपदासाठी नामनिर्देशन भरलेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली.

निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत येणार आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी दहा दिवसांचा कालावधी मिळाला आहे. हिवाळ्याच्या थंडीत ही निवडणूक होत असली तरी गावगाड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. राजकीय पक्षांनीही गावात आपले प्रस्थ दाखविण्यासाठी इच्छुकांना दावेदारी दिली आहे. आता प्रचाराचा धुरळा दहा दिवस चांगलाच उडणार असून, कार्यकर्त्यांची ढाब्यावर जत्राच भरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT