Ground Water Level Monitoring  Agrowon
ताज्या बातम्या

Water Level : मराठवाड्यात भूजल पातळी सर्वच तालुक्यांत वाढली

यंदा सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांतील भूजल पातळीचे निरीक्षण घेण्यात आले.

Team Agrowon

औरंगाबाद : यंदा सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांतील भूजल पातळीचे निरीक्षण (Ground Water Level Monitoring) घेण्यात आले. त्यासाठी ८७५ विहिरींच्या पातळीचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वच तालुक्यांतील भूजल पातळीत कमी अधिक प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९, जालनामधील ८, परभणीतील ९, हिंगोलीतील ५, नांदेडमधील १६, लातूरमधील १०, उस्मानाबादमधील ८ व बीडमधील ११ मिळून ७६ तालुक्यांतील ८७५ विहिरींचे सप्टेंबरअखेर भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वतीने निरीक्षण घेण्यात आले. निरीक्षण घेण्यात आलेल्या विहिरींमध्ये औरंगाबादमधील १४१, जालनातील ११०, परभणीतील ८६, हिंगोलीतील ५५, नांदेडमधील १३४, लातूरमधील १०९, उस्मानाबादमधील ११४ व बीड मधील १२६ विहिरींचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.६० मीटर, जालना जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.१८ मीटर, परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ३.२२, मीटर हिंगोली जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ०.७५ मीटर, नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी २.१७ मीटर, लातूर जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.३५ मीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.६९ मीटर, तर बीड जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.६२ मीटर वाढ झाली.

कमी अधिक प्रमाणात वाढ

औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद व बीड या ६ जिल्ह्यांतील १५ तालुक्यांमधील भूजल पातळीत एक मीटरच्या आत वाढ झाली आहे. परभणी, नांदेड या दोन्ही जिल्ह्यांतील २५ तालुक्यांमधील भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. याशिवाय इतर सहा जिल्ह्यांतील २१ तालुक्यांतही भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT