ताज्या बातम्या

Farmer Protest : गोरेगावात शेतकरी संपामध्ये रस्त्यावर फेकले कांदे, बटाटे

गोरेगाव (ता. सेनगाव) येथील शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी (ता. २३) अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.

टीम ॲग्रोवन

कनेरगाव नाका, जि. हिंगोली : गोरेगाव (ता. सेनगाव) येथील शेतकरी संपाच्या (Farmer Strike) आठव्या दिवशी शुक्रवारी (ता. २३) अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.

सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत. आजच्या ८ व्या दिवशी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चौफुली रस्त्यावर कांदे, बटाटे, टमाटे, भाजीपाला फेकून देत शासन विरोधात घोषणा दिल्या.

कनेरगाव - सेनगाव रस्त्यावरील हाताळा आणि सुरजखेडा फाट्यावर शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केले. वरखेडा (ता. सेनगाव) येथील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी दिंडी काढून शासनाचा निषेध केला. आंदोलनात बालाजी महाराज शिंदे वरखेडकर, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, गजानन सावके, राधेश्याम कावरखे, गजानन सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT