Crops Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : गडहिंग्लजमध्ये माळरानावरील भात पिकाने टाकली मान

Crop Loss in Agriculture : भाताचीही आंतरमशागत झाली असली तरी पावसाअभावी या पिकाचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे.

Team Agrowon

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : एकीकडे पंधरवड्यापासून गायब झालेला पाऊस आणि दुसऱ्या बाजूने तळपणारा सूर्य यामुळे तालुक्यातील माळरानावरील साधारण १२०० हेक्टरवरील भात पिकाने मान टाकली आहे. आणखी आठवडाभर पाऊस लांबला, तर हे पीक करपण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना घाम फुटला आहे. जमिनी आतापासूनच भेगाळत असल्याने धोका वाढत आहे.

गडहिंग्लज तालुक्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र आठ हजार हेक्टर आहे. यातील १० ते १५ टक्के क्षेत्र माळरानावरचे आहे. माळरानात विशेष करून भुईमूग व सोयाबीनची लागवड अधिक असते. पावसाची उघडीप मिळाल्याने आंतरमशागत, कीटकनाशक फवारणी चांगली झाली असून या पिकात अजूनही जान दिसत आहे.

भाताचीही आंतरमशागत झाली असली तरी पावसाअभावी या पिकाचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. पंधरवड्यापासून पाऊस नाही. दुसऱ्या बाजूने सूर्यही तळपू लागला आहे. परिणामी माळरानाला पाण्याची गरज भासू लागली आहे. भाताने आतापासूनच मान टाकायला सुरुवात केली आहे. मुळात अधिक पाण्याचे पीक म्हणून भाताची ओळख आहे. त्यात यावर्षी पाऊस लांबला. वेळेत पेरणी झाली नाही.

जुलैमधील पावसाने पेरणी झाली तरीसुद्धा उशीर झाल्याने पिकाची उंची अपेक्षित अशी नाही. पुढे पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. मात्र सध्या पावसाचे चित्र पाहता हे पीक शेतकऱ्यां‍च्या डोळ्यात पाणी आणेल अशी स्थिती आहे.तालुक्यात जुलैमध्ये पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला तरीसुद्धा एकदाही अतिवृष्टी झाली नाही. फक्त एकवेळ सर्वाधिक ३९ मिमी नोंद झाली. तरीही जुलैमध्ये सरासरी ओलांडली. मात्र ऑगस्ट कोरडा जातो की काय, याची भीती दाट होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT