Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : अतिवृष्टीने नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये तातडीने पंचनामे करून मदत पोहोचवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. ८) दिले.

टीम ॲग्रोवन

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे (Rain Like Cloudburst) नुकसान (Heavy Rain Damage) झालेल्या गावांमध्ये तातडीने पंचनामे (Damage Survey Due To Heavy Rain) करून मदत पोहोचवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. ८) दिले.

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, नगर या जिल्ह्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्देश दिले आहेत. नाशिक, नगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे मालमत्तेसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली.

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने पंचनामे करून मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, अशी सूचनाही दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT