Farmer Help  Agrowon
ताज्या बातम्या

Farm Implements : शेती अवजारांसाठी त्वरित अर्थसाह्य द्यावे

आदिवासी विभागांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी शेतकऱ्यांना शेती अवजारांसाठी अर्थसाह्य मंजूर निधी लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी बिरसा फायटर्सतर्फे प्रकल्पाधिकारी मंदार पत्की यांना निवेदन देण्यात आले.

Team Agrowon

तळोदा, जि. नंदुरबार ः आदिवासी विभागांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी शेतकऱ्यांना (Farmer) शेती अवजारांसाठी (Farm Implements) अर्थसाह्य मंजूर निधी लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी बिरसा फायटर्सतर्फे प्रकल्पाधिकारी मंदार पत्की यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले, की आदिवासी शेतकऱ्यांना शेती अवजारांसाठी अर्थसाह्य योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेसाठी तळोदा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तळोदा तालुक्यातील २७, अक्कलकुवा तालुक्यातील ४७, धडगाव तालुक्यातील ४२ अशी एकूण ११६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

दरम्यान, या लाभार्थ्यांसाठी ३५ लाख रुपये इतका निधी उपलब्ध आहे; परंतु अद्यापही निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. शेतकऱ्यांना मुद्दाम लाभापासून वंचित ठेवले जात आहे. लाभार्थ्यांची प्रकल्पांतर्गत निवड होऊन तीन वर्षे झाली आहेत. तसेच निधी देण्याबाबतचे आदेश देऊन त्यास आठ महिने उलटले तरीदेखील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळालेले नाही.

शेतकऱ्यांना किमान शेती अवजारे खरेदी करून मिळावीत. आदिवासींच्या विविध योजना कागदोपत्री न राबविता, पारदर्शकपणे राबवाव्यात. निवड झालेल्या ११६ पात्र लाभार्थ्यांना शेती अवजारे खरेदी करून मिळावीत, अन्यथा लाभार्थी शेतकऱ्यांसह बिरसा फायटर्सतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी आदींच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT