Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar Latest News : अल्टिमेटम द्यायचा, तर स्वत:च्या घरात द्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज ठाकरेंना इशारा

टीम ॲग्रोवन

Mumbai News : ‘‘आमचे सरकार कायद्याने चालणारे आहे. त्यामुळे कुणीही अल्टिमेटम द्यायचा नाही. असली हुकूमशाही चालणार नाही. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल, तर स्वत:च्या घरात द्या. आम्ही कायद्याने जे करायचे ते करू’’, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ५) दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही हनुमान चालिसा लावणारच, सरकारने कारवाई करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. त्याबाबत पवार यांनी ठाकरे यांना इशारा दिला.

पवार म्हणाले, ‘‘राज्यात शांतता असावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने वक्तव्ये करणे योग्य नाही. जो काही निर्णय करायचा ठरला तर सर्वांना बंधनकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राज्यात जी धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी परवानगी घ्यावी. तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’’

‘‘भोंग्यासाठी ठरावीक दिवसांत परवानगी घ्यावी. ती घेतली नाही, तर कठोर भूमिका घेतली जाईल. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न आणि तसे धाडस करू नये. न्यायालय जो निर्णय देईल, त्याचे पालन करण्याचे सर्वांचे काम आहे. सध्या काही ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच याची अंमलबजावणी करावी लागणार आहे,’’ असेही पवार म्हणाले.

‘ओबीसींना आरक्षण मिळावे ही भूमिका’

‘‘ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने योग्य भूमिका मांडली आहे. सभागृहात विरोधकांच्या मदतीने ठराव झाले आहेत. ओबीसींना आरक्षण मिळावे, ही सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यावर बैठकीत विचारमंथन होईल. पण शेवटपर्यंत ओबीसींना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. चांगले झाले तर आम्ही मिळून केले आणि विरोधात निर्णय घेतला, की ही सरकारची चूक, असे विरोधक ओरडत आहेत,’’ अशी टीकाही पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT