Rabbi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabbi Season : बाजारपेठ असल्यास राजमा ठरणार रब्बीत चांगला पर्याय

शेतकऱ्यांकडून गव्हाला पर्याय आणि तुलनेत कमी पाण्यात येणारे पीक म्हणून राजमाला पसंती मिळत आहे.

Team Agrowon

अमरावती ः शेतकऱ्यांकडून गव्हाला (wheat) पर्याय आणि तुलनेत कमी पाण्यात येणारे पीक (Crop) म्हणून राजमाला पसंती मिळत आहे. मात्र बाजारपेठ, खरेदीदार नसल्याने गेल्या काही वर्षांत शेतकरी (Farmer) या पिकापासून दुरावत चालल्याचे चित्र महाराष्ट्रात असल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या पिकाच्या चाचण्याही शेतकऱ्यांच्या शेतावर घेतल्या होत्या.

सातारा, मान, खटाव, कोरेगाव आटपाडी या भागात पूर्वी खरिपात राजमा क्षेत्र सर्वाधीक होते. वळूज बाजारपेठेत दिल्लीचे व्यापारी येऊन विकत घेत होते.१९८८-८९ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राजमाचे काही वाणही विकसित केले. परंतु आता सिंचन सुविधा वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रातही या पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे. बाजारपेठ हीच मुख्य अडचण हे पीक शाश्‍वत पर्याय ठरण्यामागे आहे.

- डॉ. एकनाथ वैद्य, कडधान्य विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

शेलगाव, शिरसाळा भागात पाच ते सहा वर्षे राजमा लागवड केली. २५ ते ३० एकरांवर लागवड शेतकरी करीत होते. ४५ हजार रुपयांचे उत्पन्न एकरी मिळायचे खर्च वजा जाता ३० ते ३२ रुपयांचा निव्वळ नफा होत होता. कोइमतूर येथून बियाणे आणले. या पिकाला खत अधिक द्यावे लागते. दरही चांगला मिळतो परंतु बाजारपेठेचा अभाव आहे. गव्हाला पाणी अधिक लागते, त्यामुळे गव्हाला पर्याय म्हणून आम्ही याकडे वळले होतो.

- डॉ. डी. एन. इंगोले, शेतकरी, शेलगाव बोदाडे, ता. मालेगाव, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Maharashtra: माॅन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल; दोन दिवसात आणखी पुढे सरकणार

Pulse Processing Centers: कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करण्यास ३० जूनपर्यंत मुदत

Farmer Protest: खत-बियाण्यांच्या मागणीसाठी कृषी कार्यालयात आंदोलन

Fruit Orchards Rain Damage: सहा हजार हेक्टरवरील फळबागांना वादळाचा फटका

Go Green Initiative: ‘गो-ग्रीन’ उपक्रमाला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT