Power Supply Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : थकबाकी न भरल्यास कृषिपंपांची वीज तोडू

महावितरणच्या पिंपळनेर विभागात कोट्यवधी रुपयांची वीजदेयके थकीत आहेत.

Team Agrowon

म्हसदी, जि. धुळे : महावितरणच्या (Electricity) पिंपळनेर विभागात कोट्यवधी रुपयांची वीजदेयके थकीत आहेत. ग्राहकाभिमुख सुविधांसाठी वीजग्राहकांनी तत्काळ थकबाकी भरत कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन वितरण कंपनीचे पिंपळनेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांनी केले. कृषिपंपांचे थकीत बिल वेळेत न भरल्यास वीजजोडणी (Power connection) तोडली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

‌‌वी‌जबिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने महावितरणचे सरव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी बैठकीत वीज वितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘खडेबोल’ सुनावत वसुली करता येत नसेल, तर थेट घरी बसा, असा इशारा दिला आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या अभियंता, कर्मचाऱ्यांनी वीजदेयक वसुलीचा धडाका लावला आहे.

एकट्या पिंपळनेर विभागात सर्वच प्रकारच्या वीजग्राहकांकडे तब्बल १८६ कोटी थकबाकी आहे. दोन महिन्यांपूर्वी महावितरणाच्या अभियंत्यांची वीजबिल वसुलीसाठी बैठक झाली. बैठकीत उद्दिष्ट‌ पूर्ण करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या. कृषिपंप असो वा घरगुती ग्राहक थकबाकीदारांचा थेट वीजपुरवठा खंडित करा, अशा सूचना डांगे यांनी दिल्या.

‘थकीत वीजबिल भरा’

पिंपळनेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार यांनी पिंपळनेर मंडळातील थकबाकीदार ग्राहकांना थकीत बिल भरण्याचे आवाहन केले आहे. महावितरणचा घरगुती ग्राहक असो किंवा कृषिपंपधारक प्रत्येक थकबाकीदार ग्राहकाने नियमानुसार वीजबिल भरावे.

नोटिसा देऊनही वीजबिल भरत नसतील तर अशा ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करावी लागेल. महावितरण कंपनी‌ खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करूनच ग्राहकांना वीजपुरवठा पुरविते. वेळेवर वीजबिल भरावे, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT