Soybean Seed Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Seed Production : सोयाबीन ग्रामबीजोत्पादनासाठी घरचे बियाणे मोहीम

Soybean Sowing : गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

यंदा खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे ग्रामबीजोत्पादनासाठी घरचे बियाणे मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाकडून सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात घरचे बियाणे मोहीम राबविण्यात आली होती. याचप्रकारे चालू वर्षीही ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यात ४१ हजार ५५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी सुमारे ४१ हजार ५५ क्विंटलची आवश्यकता असते.

गेल्या वर्षी या मोहिमेत सुमारे ८ हजार ७९ शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी ४२ हजार २७० क्विंटल बियाण्यांचे उत्पादन घेतले होते. तरीही वाढीव क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याची आवश्यकता असते. यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती. परंतु काढणीच्या वेळेस अति झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे चालू वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियण्यांची काही प्रमाणात अडचण भासण्याची शक्यता आहे.

ऐन वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी ही मोहीम राबवत शेतकऱ्यांनी घरच्या घरी ग्रामबीजोत्पादन मोहीम राबवून घरीच चांगल्या दर्जाचे सोयाबीनचे बियाणे तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

पूर्वी जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र कमी होते. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकरी या पिकांकडे वळत आहेत. त्यातच खरीप हंगामात सोयाबीनचे नुकसान होत असल्याने चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ही मोहीम प्राधान्याने खरीप हंगामात राबवित चांगल्या दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना तयार करता येणार आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT